सावर्डे : रस्त्यावर वाहन उभे केल्याप्रकरणी चालकावर गुन्हा

सावर्डे : सावर्डे बाजारपेठ येथील सर्व्हिस रोडवर अॅपे रिक्षा उभी केल्याप्रकरणी चालकावर सावर्डे पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निजामुद्दीन मकबुल शेख (३५, रा. गोवळकोट रोड, चिपळूण) असे चालकाचे नाव असून, ही कारवाई शनिवारी सकाळी करण्यात आली.

हेडकॉन्स्टेबल सतीश कदम या भागात पेट्रोलिंग करत असताना वाहन सार्वजनिक रस्त्यावर उभे असल्याचे लक्षात आले. त्यामुळे वाहनांना व पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होऊन धोका निर्माण झाल्याने ही कारवाई करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:57 PM 05/May/2025