दापोलीत अंमली पदार्थ सेवन प्रकरणी तरुण अटकेत

दापोली, 06 मे 2025: दापोली बाजारपेठेतील चिल्लंगी मोहल्ल्यात नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या टेरेसवर गांजा सेवन करणाऱ्या 28 वर्षीय तरुणाला दापोली पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 4 मे 2025 रोजी रात्री 10:50 वाजता ही घटना घडली. दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल उदय केशव टेमकर (पोकॉ/475) यांना गस्ती दरम्यान माहिती मिळाली की, चिल्लंगी मोहल्ल्यातील एका नवीन इमारतीच्या टेरेसवर अंमली पदार्थाचे सेवन होत आहे. पोलिसांनी तातडीने छापा टाकला असता, आरोपी मोहम्मद जमा इस्तफाक अहमद शेख (वय 28, मूळ रा. दुर्गजोत, संत कबीर नगर, उत्तरप्रदेश, सध्या रा. चिल्लंगी मोहल्ला, दापोली) हा गांजा सेवन करताना आढळला.

गुन्हा दाखल : फिर्यादी उदय टेमकर यांच्या तक्रारीनुसार, 5 मे 2025 रोजी पहाटे 12:33 वाजता दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 85/2025 अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी कायदा 1985 चे कलम 8(क) आणि 27 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दापोली पोलिसांनी परिसरातील नागरिकांना अंमली पदार्थांच्या वापराबाबत सतर्क राहण्याचे आणि संशयास्पद गतिविधींची माहिती तातडीने पोलिसांना देण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास दापोली पोलीस ठाणे करत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 AM 06/May/2025