मंडणगडात तालुक्यात प्रथम ऋतिक घाग तर वैदवी पवार द्वितीय

मंडणगड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील ऋतिक धाग याने वाणिज्य शाखेत (९१.३३) गुण मिळवत तालुक्यात प्रथम, वैदवी पवार हिने कला शाखेत (८१.८३) गुण मिळवून द्वितीय तर वाणिज्य शाखेतून ऋतिक खर्सेकर (८१.३३) गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला.

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला शाखेचा निकाल ८६.६७ टक्के लागला. परीक्षेस बसलेल्या ६० पैकी ५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वैदवी पवार (८१.८३), अनुजा गरड (७३.३३), अक्षता पवार (७१.३३) यांनी अनुक्रमे पहीले तीन क्रमांक मिळवले. वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के लागला. परीक्षेस बसलेल्या ५६ पैकी ५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ऋतिक घाग (९१.३३) ऋतिक खर्सेकर (८१.३३) सुविधा लोखंडे (८०.३३) यांनी अनुक्रमे पहीले तीन क्रमांक मिळवले. विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला परीक्षेस बसलेल्या ६८ पैकी ६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पियुष नगरकर (७७.५०) सृष्टी गोसावी (७१.८३) अक्षता यादव (६७.१७) यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक मिळवले.

देव्हारे कनिष्ठ महाविद्यालय पंचक्रोशी कनिष्ठ महाविद्यालय देव्हारे च्या कला शाखेचा निकाल ९६.२२ टक्के लागला. परीक्षेस बसलेल्या ५३ विद्याथ्यांपैकी ५० विद्यार्थी पास झाले. कला शाखेत सुबोधन पवार (८१.१७) अजमिना सातारकर (६४.६७) पुजा खैरे (६३.६७) यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक मिळवले. तर वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के लागला ४८ पैकी ४८ विद्यार्थी पास झाले. मनस्वी सावंत (६९.१७) सुरज रटाटे (६९.१७) चंदना देवघरकर (६८.८३) रसिदा घरवे (६७.१७) यांनी अनुक्रमे पहीले तीन क्रमांक मिळवले.

जर्मन परकार बाणकोट बाणकोट येथील जर्मन परकार वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाचा वाणिज्य शाखेचा निकाल ९४.७ टक्के इतका लागला. परीक्षेस बसलेले १९ पैकी १८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. इकरा दादरकर (८१.१७) रैना हमदुले (६७.३३) इकरा बेग (५७.००) यांनी अनुक्रमे पहीले तीन क्रमांक मिळवले.

कर्मवीर भि.रा. तथा दादा इदाते वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मंडणगड- या विज्ञान शाखेचा निकाल टक्के लागला. परीक्षेस बसलेल्या २१ विद्याध्यपैिकी २१ उत्तीर्ण झाले. नेहा ऋतिक खसेंकर बामणे (६४.५०) श्रद्धा मोडकले (५८.८३) रोहन नलावडे (५७.५०) यांनी प्रथम तीन क्रमांक मिळवले. महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेचा निकाल ९७.६२ टक्के लागला. परीक्षेस ४२ विद्यार्थ्यांपैकी ४१ विद्यार्थी पास झाले. मेघना यादव (७८.३३) सिध्दी दिवेकर (७७.००) अनिशा कदम (७६.८३) यांनी प्रथम तीन क्रमांक मिळवले.

कुंबळे कर्मवीर भि.रा.तथा दादा इदाते कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला शाखेचा निकाल ९०.९० टक्के लागला परीक्षेस प्रविष्ठ ३३ विद्याध्यापिकी ३० पास झाले. शहब तांबे (७७.१७) सानीका शिगवण (७४.८३) आदीत्य गोठल (६२.००) यांनी प्रथम तीन क्रमांक मिळवीले. वाणिज्य शाखेचा निकाल शंभर टक्के लागला परीक्षेस बसलेले २० विद्यार्थी बसले होते २० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. श्रृती लोखंडे (६८.१७) श्रध्दा पवार (६५.८३) मंजु चव्हाण (६५.६७) यांनी प्रथम तीन क्रमांक मिळवले.

शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्थेचा निकाल १०० टक्के लागला टेक्नीकल सायन्सचे दोन विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ झाले होते ते दोनही विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 AM 06/May/2025