गणपतीपुळे : छावा प्रतिष्ठान रत्नागिरी तर्फे श्री छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्त एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन १४ मे रोजी करण्यात आले आहे. ही स्पर्धा तालुक्यातील नारशिंगे येथील छावा प्रतिष्ठानच्या रंगमंचावर होणार आहे.
या स्पर्धेसाठी कोणत्याही ऐतिहासिक नाटकातील, एकांकिकेतील अथवा स्वरचित उतारा चालणार आहे तसेच सादरीकरणासाठी सात मिनिटे ठेवण्यात आले आहेत ही स्पर्धा रत्नागिरी जिल्हा मर्यादित राहणार आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकासाठी रोख रुपये २२२२/- चे पारितोषिक आणि स्मृतीचिन्ह तर द्वितीय क्रमांकासाठी १५५५/- चे पारितोषिक आणि स्मृतीचिन्ह तर तृतीय क्रमांकासाठी ११११/- चे पारितोषिक आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी छावा प्रतिष्ठानचे सदस्य प्रथमेश पवार मोबाईल क्रमांक ८४४६ ४३ ३७ ४९ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:37 PM 06/May/2025














