रत्नागिरीज कॅराओके आयडॉल सीझन एक ऑडिशन

रत्नागिरी : रत्नागिरी येथे होत असलेल्या जिल्हास्तरीय भव्य दिव्य कॅराओके आयडॉल स्पर्धेची पहिली ऑडिशन देवरुख येथील नक्षत्र हॉल येथे 8 मे 2025 रोजी सकाळी 10 ते 1 या वेळेत घेण्यात येणार आहे.

कॅराओके आयडॉल या स्पर्धेचा मुख्य इवेंट रत्नागिरी येथे दिनांक 26 अणि 27 मे रोजी असे दोन दिवस चालणार असून. चार फेऱ्यांमधून रत्नागिरीचा कॅराओके आयडॉल निवडला जाणार आहे आहे.

यासाठी सर्वप्रथम प्रत्येक तालुक्यात पात्रता फेरी होणार असून या पैकी पहिली पात्रता फेरी ‘देवरुख’ येथे 8 मे 2025 रोजी होत आहे. या साठी भाग घेऊ इच्छित असलेल्या स्पर्धकांना वर नमूद तारखेस थेट ऑडिशन साठी येण्याचे आवाहन ‘गुंजन इव्हेट’ च्या आयोजकांनी केले आहे. स्पर्धकांना सदर दिवशी ऑडिशन देणे शक्य नसल्यास ते इतर तालुक्यामध्ये येऊन ऑडिशन देऊ शकतात.
देवरुख येथे पहिली ऑडिशन समाजसेवक श्री. युयुत्सू आर्ते यांच्या सौजन्याने होत आहे. अधिक माहितीसाठी स्पर्धेचे मुख्य आयोजक ॲड. सरताज कापडी फोन- 9423292787, ॲड. अमित नागवेकर 9604010101 या क्रमांकावर संपर्क साधावा.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 07-05-2025

Vinayka motars