रत्नागिरी : गोविळ (ता. लांजा) येथील प्रौढ आंब्याच्या कलमावर चढला असता फांदी तुटल्यामुळे खाली पडला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
सुहास गंगाराम लाखण (५१, रा. गोवीळ, ता. लांजा) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (५ मे) सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास गोवीळ येथे घडली. यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुहास लाखण हे सकाळी आंबा कलमाच्या झाडावर आंबे काढत असताना हातात धरलेली फांदी अचानक तुटली आणि ते पंधरा फूट खाली पडले. त्यांच्या छातीला मुका मार लागला.
या घटनेनंतर तत्काळ त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. पोलिस चौकीत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 AM 07/May/2025












