रत्नागिरी : प्रिंदवणेत फळमाशी रक्षक सापळ्यांचे वाटप

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील प्रिंदवणे ग्रामपंचायतीमध्ये सिंधुरत्न योजनेतून कृषी विभाग रत्नागिरीच्या वतीने फळमाशी रक्षक सापळा आणि अॅनिमल repellent यांचे वाटप सरपंच श्रीकांत मांडवकर यांच्या हस्ते करण्यात आले. शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षांपासून वानर आणि माकडांचा मोठा त्रास सहन करावा लागलाय, या वानरांच्या उपद्रवामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. यावर पर्यायी मार्ग म्हणून वानरांचा उपद्रव टाळण्यासाठी एनिमल आऊट हे फवारणी औषध प्रात्यक्षिकसाठी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे.

तसेच आंब्यावर फळमाशीचा मोठा त्रास होत असतो. यामुळे पिकाचं नुकसान होते. यासाठी शेतकऱ्यांना फळमाशी रक्षक सापळ्याचंदेखील वाटप करण्यात आले. प्रिंदवने ग्रामपंचायत कार्यालयात हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला मंडळ कृषी अधिकारी प्रदीप भुवड, कृषी सहायक सचिन पवार तसेच शेतकरी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:13 PM 07/May/2025