देवरूख : घराच्या बाजूला आंब्याच्या झाडाखाली ठेवलेली गावठी हातभट्टीची दारू पोलिसांनी जप्त करत एका प्रौढावर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सोमवारी सायंकाळी संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब तांबटवाडी येथे करण्यात आली.
याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सत्यजीत दरेकर यांनी फिर्याद दिली असून, निवास काशीराम जाधव (४६) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून २१०० रुपयांची २० लिटर दारू जप्त करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:09 PM 07/May/2025














