रत्नागिरी रेल्वे स्थानक परिसरात एअर स्ट्राईकचा मॉक ड्रिल

रत्नागिरी : शहराजवळील कुवारबाव येथील कोकण रेल्वे स्थानकाच्या परिसरात ७ मे रोजी एअर स्ट्राईकचा मॉक ड्रिल करण्यात आला.

रेल्वे आणि परिसरात झालेल्या हल्ल्यानंतर कोकण रेल्वेच्या विविध विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह कोकण रेल्वेची यंत्रणा तात्काळ घटनास्थळी पोहोचली.

घडलेल्या घटनेची माहिती पोलिस, अग्निशामक, आरोग्यसह आवश्यक विभागांना देण्यात आली. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी रेल्वे आणि बाहेरील जखमींना आपत्कालीन स्थितीत उभारण्यात आलेल्या तंबूत हलवून प्रथमोपचार केले. यानंतर दाखल झालेल्या रुग्णवाहिकेतून जखमींना अधिक उपचाराकरिता हलवण्यात आले.

रेल्वे प्रशासनाकडून माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाचा आरोग्य, अग्निशामक, पोलिस विभाग यंत्रणेसह दाखल

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 AM 08/May/2025