खेड : धुमसणाऱ्या कचऱ्यामुळे समर्थनगरच्या रहिवाशांचे आरोग्य धोक्यात

खेड : शहरातील कचरा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. जागेअभावी कचरा प्रकल्पाचे घोंगडे अजूनही भिजत पडले आहे. सद्यस्थितीत समर्थ नगर येथे जाळून कचऱ्याची विल्हेवाट लावली जात आहे. दिवसभर धुमसणाऱ्या कचऱ्याचा समर्थनगरच्या रहिवाशांचा श्वास कोडत असल्याने आरोग्य धोक्यात आले आहे.

शहरातून दिवसाकाठी जमा होणाऱ्या होणाऱ्या ८ टनाहून अधिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी नगर प्रशासनाकडे अजूनही हक्काची जागा नाही एकीकडे नगर प्रनासन ‘स्वच्छ खेड, सुंदर खेडचा डांगोरा पिटत कचरामुक्त शहरासाठी झटत असली तरी जागेअभावी कचराप्रश्न ऐरणीवर आला आहे. कचरा ची जागा पदरात पडलेली नाही. यामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावायची तरी कुठे, असा प्रश्न नगरप्रशासनाला सतावत आहेत.

डम्पिंग ग्राऊंडमध्ये कचारा सर्रासपणे जाळला जात आहे. आधीच कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे समर्थनगर येथील रहिवासी बेजार झाले आहेत. त्यात धुमसणाऱ्या कचऱ्यामुळे आरोग्य ची टांगती तलवार कायम आहे. समर्थनगर येथील रहिवाशांनी कचरा टाकण्यास मज्जाव करत त्यांच्या संतापाचा उद्रेक झाला होता.

शहरातून गोळा होणारा कचरा समर्थनगर येथे आणून डम्पिंग करण्याची प्रक्रिया वर्षानुवर्षे सुरू आहे. कचरा सर्रासपणे जाळला जात असल्याने धुमसणाऱ्या कचऱ्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. एकप्रकारे समर्थनगरच्या रहिवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे.

चारच दिवसांपूर्वी कचरा डेपोत धुमसणाऱ्या कचऱ्यामुळे आगडोंब उसळल्यानंतर नगर प्रशासनाची त्रेधातिरपीट उडाली होती. कचरप्प्रश्नी योग्य ती तोडगा न काढल्यास आक्रमकतेचा अवलंब करावा लागेल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:27 AM 08/May/2025