रत्नागिरी : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत रत्नागिरी, चिपळूण, संगमेश्वर व राजापूर या तालुक्यांमध्ये जिवित नोंदीत बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच व गृहोपयोगी संच वाटप सुरु आहे. तथापि, सद्यस्थितीत रत्नागिरी तालुक्यातील सी-५, पिनोअर ब्रिक्स मिरजोळे, एम.आय.डी.सी, रत्नागिरी या ठिकाणी वाटप सुरु असून, या ठिकाणी नागरिकांची प्रचंड गर्दी होत आहे.
काही महिला वर्ग रात्रीपासून याठिकाणी वस्तीला येत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा प्रसंगी त्यांच्या सुरक्षेचा विचार करता व गर्दी टाळण्याच्या दृष्टीने एम.आय.डी.सी. ठिकाणचे वाटप केंद्र बंद ठेवण्यात येत आहे.
रत्नागिरी तालुक्यातील ग्रामपंचायत पातळीवर नियोजन करण्यात येवून ग्रामपंचायत निहाय अत्यावश्यक संच व गृहोपयोगी संच वाटप करण्यात येईल, असे सहायक कामगार आयुक्त संदेश आयरे यांनी कळविले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:38 AM 08/May/2025














