रत्नागिरी : खासगी बालवाड्यांची नोंदणी बंधनकारक

रत्नागिरी : राज्यात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने ३ ते ६ वयोगटातील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या खासगी केंद्राची अथवा शाळांची नोंदणी करण्याचे निर्देश राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. अशा बालवाडीच्या नोंदणीसाठी राज्य सरकारने एक विशेष पोर्टल सुरु केले आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये पहिली ५ वर्षे म्हणजे पूर्व प्राथमिक शाळेची ३ वर्षे (वयोगट ३ ते ६) व इयत्ता पहिली आणि इयत्ता दुसरी (वयोगट ६ ते ८) यांचा समावेश आहे. सद्यस्थतीत वय वर्षे ३ ते ६ वयोगटातील बालकांना अंगणवाडधा, बालवाड्या शाळेला जोडून पूर्व प्राथमिक वर्ग व खासगी पूर्व प्राथमिक वर्ग यामधून शिक्षण दिले जाते. मात्र, आता शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बालवाड्या व अंगणवाड्या यांची नोंदणी व माहिती महिला व बालविकास विभाग यांच्याकडे करणे बंधनकारक आहे.

खासगी पूर्व प्राथमिक वर्गाची अधिकृत महिती सद्यस्थितीमध्ये शासनाकडे उपलब्ध नाही. वयोगट ३ ते ६ साठी पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या सर्व खासगी केंद्राची माहिती एकत्रित स्वरुपात राज्यस्तरावर, जिल्हास्तरावर तसेच पालकांनाही उपलब्ध असणे आवश्यक आहे.

ऑनलाईन नोंदणी सुविधा….
महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत https://education.maharashtra. gov.in या संकेतस्थळावर खासगी बालवाडी नोंदणीची सुविधा देण्यात आली आहे. नोंदणी प्रक्रियेत केंद्राची सर्वसाधारण माहिती, व्यवस्थापनाचे तपशील, विद्यार्थी संख्या, उपलब्ध भौतिक सुविधा, कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती भरणे आवश्यक आहे. या नोंदणीबाबतचा अहवाल प्राथमिक शिक्षण संचालकाने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Radhakrushna patapedhi

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 AM 09/May/2025