रत्नागिरी : शहरानजीकच्या चंपक मैदान येथे सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवार ७ मे रोजी दुपारी १२ वा. सुमारास करण्यात आली.
प्रसाद श्रीराम कोकजे (४२, रा. निवळी कोकजे वठार, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. तो बुधवारी दुपारी त्याच्याकडे दारु पिण्याचा कोणताही परवाना नसताना चंपक मैदान येथे दारु पिण्यासाठी बसलेला असताना आढळून आला. त्यामुळे शहर पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:21 AM 09/May/2025














