खेड : तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या गावांच्या यादीत ३४ गावांचा समावेश करण्यात आला आहे. तालुका आरोग्य विभागाने तशी यादी तयार केली आहे.
पावसाळ्यात या दुर्गम भागातील गावांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून आरोग्य सुविधा पुरविण्याच्यादृष्टीने आतापासूनच नियोजनावर भर देण्यात आल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी शैलेश खरटमोल यांनी सांगितले. आंबवली प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सर्वाधिक दुर्गम गावे असून ही संख्या १८ इतकी आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:55 PM 10/May/2025
