रत्नागिरी : जाहिरात फलकांची दक्षता घेण्याची शासकीय विभागांना सूचना

रत्नागिरी : पावसाळ्यातील जोरदार वाऱ्यांमुळे मोठमोठे जाहिरात फलक व इतर बॅनर पडून दुर्घटना होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने संबंधित शासकीय विभागांना दक्षता घेण्यास सुचित केले आहे. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, पेट्रोल पंप मालकांना आवश्यक ती खबरदारी घेण्यास कळवण्यात आले आहे.

पेट्रोल पंपांच्या ठिकाणीसुद्धा जाहिरात फलक लागलेले असतात. हे जाहिरात फलक सुरक्षित आहेत की नाही? शासकीय विभागाच्या अधिकार क्षेत्रातील जाहिरात फलकांना परवानगी आहे की नाही? त्याचबरोबर हे जाहिरात फलक किंवा बॅनर पावसाळा आणि जोरदार वाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित आहेत की नाही, हे तपासून घेण्याची सूचना करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:45 PM 12/May/2025