खेड : ‘सीएनजी’साठी लोटे येथे वाहनांची रांग

आवाशी : उन्हाळी सुटी पडल्याने मुंबईकरांनी गावची वाट धरली आहे. बहुतांशी मुंबईकर सीएनजीवरील वाहने घेऊन येत आहेत. मात्र, सीएनजीच्या तुटवड्यामुळे वाहनचालकांना तासन् तास रांगेत उभे राहावे लागत आहे. रविवारी खेड तालुक्यातील लोटे येथील पंपावर वाहनांची लांबच लांब रांग लागली होती.

मुंबई-गोवा महामार्ग अद्यापही अपूर्ण असल्याने कोकणात येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच सीएनजीच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. हंगामामध्ये सीएनजीचा तुटवडा होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.

राज्यातील इतर जिल्ह्यांपेक्षा रत्नागिरीत ही समस्या अधिक जाणवत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:18 PM 12/May/2025