मुंबई : भारतीय उद्योग जगताचे पितामह रतन टाटा यांचे बुधवारी (दि.10) मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यावर गुरुवारी वरळीतील पारसी स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रार्थना सभागृहात पारसी पद्धतीने त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
अनेक मान्यवरांचा अश्रूंचा बांध फुटला
दरम्यान, रतन टाटा यांचे निधन झाल्यानंतर मुंबई पोलिसांकडून त्यांना मानवंदना देण्यात आली. ब्रीचकँडी रुग्णालयात निधन झाल्यानंतर रतन टाटा यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे पार्थीव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या NCPA मध्ये सकाळी 10 ते दुपारी चार पर्यंत ठेवण्यात आले होते. यावेळी रतन टाटा विविध धर्मातील धर्मगुरुंनी अंत्यदर्शन घेतले. टाटांच्या अंत्यदर्शनासाठी आलेल्या अनेकांचा अश्रूंचा बांध फुटलेला पाहायला मिळाला.
सर्व क्षेत्रातील लोकांकडून रतन टाटांचे अंत्यदर्शन
राजकीय, मनोरंजन आणि सर्वच क्षेत्रातील लोकांनी मुंबईत रतन टाटा यांच्या अंत्यदर्शनासाठी दाखल झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री आदित्य ठाकरे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार या सर्वांनी रतन टाटा यांचे अंत्यदर्शन घेतले. भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, दिग्दर्शक मधू भांडारकर, ईशा अंबानी, आनंद पिरामल यांनी देखील रतन टाटा यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली वाहिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:04 11-10-2024
