खेड : येथील ब्रह्माकुमारी विद्यालयाच्या वतीने १५ मे ते २१ मे या कालावधीत सात ते पंधरा वयोगटातील मुला-मुलींकरिता मोफत समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते १२ या वेळेत होणाऱ्या या शिबिरात विद्यार्थ्यांना नैतिक मूल्यांची शिकवण, मेडिटेशन, तसेच क्रिएटिव्ह अॅक्टिव्हिटीज शिकवण्यात येणार आहेत, अशी माहिती विद्यालयाच्या खेड येथील संचालिका ब्रह्मकुमारी गीता यांनी दिली आहे.
या शिबिरात विविध आकर्षक स्पर्धा घेतल्या जाणार असून सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात येईल. शिबीर पूर्णपणे मोफत असून, प्रवेशासाठी केवळ ५० विद्यार्थ्यांची मर्यादा आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर आपली नावे लाईट हाऊस महाडनाका खेड येथे नोंदवावीत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 AM 13/May/2025
