खेड : पैशाच्या मागणीवरून दोघांनी मिळून एका शेतकऱ्यास रस्त्यावर लोखंडी वस्तू डोक्यात मारून गंभीर दुखापत केली. ही घटना खेड खोपी (रोहिदासवाडी) येथील पुलाजवळ ११ मे रोजी रात्री घडली. सुनील आत्माराम भोसले (वय ५३, रा. मिलें, हुंबरवाडी, ता. खेड) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे.
त्यांने दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे खोपी येथे पायी जात असताना दिनेश वासुदेव सुतार (रा. मिर्ले, वडाची वाडी) याने पैशाची मागणी करत, जसे तुझ्या मोठ्या भावाला जाग्यावर बसवले तसे तुलाही बसवीन, अशी धमकी देत त्याच्या हातातील लोखंडी वस्तूने डोक्यावर वार केला.
त्यानंतर दिनेश व त्याच्यासोबत असलेल्या अनोळखी इसमाने संगनमताने फिर्यादीस रस्त्यावर खाली पाडून लाथाबुक्यांनी मारहाण केली व पनवेलला नेऊन ठार मारीन अशी धमकी दिली. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास खेड पोलिस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 AM 14/May/2025













