चिपळूणच्या सामी खानच्या चित्रपटाची कान्स महोत्सवासाठी निवड

रत्नागिरी : चिपळूणमधील कलाकारांनी बनवलेल्या मार्चे डू फिल्म (सी लाट – शी जिन – भयपट विनोदी) या चित्रपटाची कान्स चित्रपट महोत्सवात निवड झाली आहे.

चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण चिपळूणमध्ये झाले आहे, संपूर्ण टीम चिपळूणची आहे.

चित्रपटाचा प्रीमियर शो रविवार १८ मे रोजी दुपारी १ वाजता कान्स चित्रपट महोत्सवात होणार आहे.

यापूर्वी, या चित्रपटाला स्वीडन चित्रपट महोत्सव (युरोप),दुबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, डिजिटल ग्रिफिक्स चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक सामी खान असून ते चिपळूणमधील आहेत. त्यांनी डीबीजे कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेआहे. दिग्दर्शक म्हणून सामी खानची वेब सिरीज एबी एलएलबी सध्या अॅमेझॉन एमएक्स ओटीटीवर सुरू आहे. ही मालिका चिपळूणमधील डीबीजे कॉलेजमध्येदेखील चित्रित करण्यात आली होती.

सामी खानने नेहमीच चिपळूणचे सौंदर्य आणि तेथील जनभावना सिनेमाद्वारे जगासमोर दाखवण्याचे स्वप्न पाहिले आहे. चिपळूणकरांकडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल आणि मदतीबद्दल संपूर्ण टीम आभारी असल्याचे त्याने नमूद केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:00 14-05-2025