रत्नागिरी : अचीव्हर्स क्लासेसने दरवर्षी प्रमाणे यंदाही निकालाची परंपरा कायम राखली आहे.
कु. गौरव मांडवकर (98.20%), आफिफ अत्तार (96.40%),पूजा कोसुंबकर (95.60%), प्रियम बारगोडे (94.40%), भूमिका गुरव (94.00%), आरुषी बोरकर (93.40%), साहिल माने (90.20%), विभोर किर (90.00%) यांनी 90% वरील गुण प्राप्त करून घवघवीत यश संपादन केले आहे.
क्लासेस मध्ये 95% वरील 4 विदयार्थी, 90% वरील 9 विदयार्थी, 85% वरील 19 विदयार्थी,80% वरील 24 विदयार्थी संख्या असून सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
दि.14-05-2024 रोजी 90% वरील विद्यार्थ्यांचा क्लासच्या वतीने सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी क्लासमधील मार्गदर्शन करणारे शिक्षकवृंद आणि पालक उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:56 14-05-2025














