रेल्वेतून पडून २० वर्षीय युवकाचा मृत्यू

खेड : तालुक्यातील कोतवली येथे रेल्वेतून पडून एका २० वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. करनकुमार कृष्णमोहन साह असे मृत युवकाचे नाव असून तो बिहारमधील सिवान जिल्ह्यातील पडरीयाचा रहिवासी होता. ही घटना 13 मे रोजी सकाळी घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करनकुमार हा पनवेलहून चिपळूणकडे रेल्वेने प्रवास करत होता. सकाळी सुमारे ११.०० वाजता तो अचानक रेल्वेतून खाली पडला. या अपघातात त्याच्या डोक्याला आणि कपाळाला गंभीर दुखापत झाली, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. करनकुमार रेल्वेतून कसा पडला, याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:46 15-05-2025