रत्नागिरी : पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवर्गानुसार प्रतिमहिना पाच वर्षे मिळणार शिष्यवृत्ती

रत्नागिरी : संशोधनाला चालना मिळावी म्हणून विद्यापीठ अनुदान आयोग, सरकारच्या वतीने पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती दिली जाते. त्याचबरोबर परदेशी फेलोशिपही विद्यार्थ्यांना मिळते. आपण पीएच.डी. करताय तर विविध योजनेतून शिष्यवृत्तीची सोय करण्यात आली आहे. जिल्ह्यासह राज्यभरात पीएच. डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल वाढला असून त्यामुळे संशोधन ही वाढले आहे.

सरकार, विद्यापीठाच्या वतीने आता संशोधनावर मोठ्या प्रमाणात भर देण्यात येत आहे. पीएच. डी. अभ्यासक्रमाचा कालावधी पाच ते सात वर्षांपर्यंत असतो आणि त्यामुळे अनेकांसाठी आर्थिक खर्चाचा बोजा पडतो. या शिष्यवृत्त्यांमार्फत विद्यार्थ्यांचे संशोधन कार्य आणि शिक्षण खर्च भागवण्यासाठी सरकार मदत करत आहे.

पीएच. डी. शिष्यवृत्तीसाठी अनेक योजना आणि संधी उपलब्ध आहेत. ज्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत आणि संशोधन सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे कला, वाणिज्य, सायन्स व विविध अभ्यासक्रमातून विद्यार्थी आता पीएच.डी. करीत आहेत. त्याला अर्थसाहय्य व्हावे म्हणून शिष्यवृत्ती सरकारच्या वतीने देण्यात येत आहे. त्यामुळे ज्या कोणी विद्यार्थ्यांना विशिष्ट विषयावर संशोधन करून पीएच. डी. करायची आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी सरकारच्या वतीने विविध प्रवर्गात शिष्यवृत्ती दरमहा असे पाच वर्षे देत आहे. त्यामुळे ज्यांना पीएच.डी. करायची मात्र परिस्थिती नाही अशांनी कोणतीही चिंता न करता पीएच.डी. करावी त्यांच्यासाठी सरकार शिष्यवृत्ती देणार आहे.

यांना मिळते शिष्यवृत्ती
जे विद्यार्थी पीएच.डी. परीक्षा पास आहेत. तसेच ज्यांचा लिस्टमध्ये नंबर लागला आहे. अशांना गाईडअलाकूड करून पीएच.डी. सुरू असते. हे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. अर्जाची पाहणी करून त्या विद्यार्थ्यांचे नाव समिती निश्चित करीत असते.

पीएच.डी. साठी शिष्यवृत्ती मिळणार

बार्टी– एस.सी. प्रवर्गातील विद्याथ्र्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च फेलोशीप आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना महिन्याला ४० हजार रूपये मिळतात, असे पाच वर्षे आर्थिक मदत मिळते.

महाज्योती -मागासवर्ग व इतर मागासवर्गातील अर्थात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी महाज्योती महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षणसंस्थेच्या माध्यमातून पीएच. डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने दरमहा ३१ हजार रूपये देतात. तसेच संस्थेच्या वतीने स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तासिका ठेवण्यात आल्या आहेत.

सारथी – छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या वतीने मराठा, ईडब्ल्यूएसच्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सारथी ही शिष्यवृत्ती देण्यात येते. प्रत्येक महिन्याला ३७ हजार रूपये मिळतात

मार्टी – मौलाना अबुलकलाम आझाद फेलोशिप अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारच्या वतीने मार्टी अर्थात मौलाना अबुल कलाम आझाद फेलोशीप सुरू आहे. यामध्ये जैन, बौद्ध, मुस्लिम आणि शीख, ख्रिश्चन समाजातील विद्याथ्यर्थ्यांना याचा लाभ होतो. दर महिन्याला ३० हजार रूपये विद्यार्थ्यांना मिळतात.

सार्टी– आदिवासी विद्यार्थीसाठी सार्टी ही फेलोशीप असून विद्यार्थ्यांना दर महिन्याला ठरवून दिलेली रक्कम मिळते.

अशी मिळते शिष्यवृत्ती
अनेक शिष्यवृत्ती योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहे. त्यानंतर विद्याथ्यांना एक संशोधन प्रस्ताव सादर करावा लागतो. सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर शिष्यवृत्ती समिती अर्जाची तपासणी करून विद्याथ्यांची निवड करते. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा केली जाते.

पीएच.डी. करायची मग हे असणार नियम
तुम्ही कोणत्याही विषयात पदवी, पदव्युत्तर आवश्यक, ज्यात ५५ टक्के गुण आवश्यक, विद्यापीठ, संस्था, युजीसी, नेट, सेट वा परीक्षा घेतात, त्यात उत्तीर्ण होणे आवश्यक, परीक्षा पास उत्तीर्ण झाल्यानंतर मुलाखत होईल, त्यानंतर मेरीट लिस्ट लावण्यात येईल. त्यामध्ये नाव असेल

तर ते विद्यार्थी पात्र
संशोधन पूर्ण करण्यासाठी विषय, मार्गदर्शक निवडावे लागेल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:43 PM 15/May/2025