गुहागर : चिखली येथील हॉटेलमध्ये आचाऱ्याचा मृत्यू

गुहागर : तालुक्यातील चिखली येथील हॉटेल वाडा मधील एका आचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. दत्ताराम कृष्णा घाणेकर (४६ वर्षे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दत्ताराम हे चिखली येथील वाडा चिरेबंदी येथे आचारी म्हणून काम करत होते आणि तेथेच मुक्कामी थांबत होते. काम संपल्यावर ते हॉटेलच्या रिसेप्शनमध्ये झोपण्यासाठी गेले होते.

आज सकाळी हॉटेलमधील सफाई कामगार अनिता गावणंग साफसफाईसाठी गेल्या असता, त्यांना दत्ताराम हे निपचित पडलेले दिसले. त्यांनी तातडीने हॉटेलचे केअर टेकर रमेश चव्हाण यांना याबाबत माहिती दिली. रमेश चव्हाण यांनी हॉटेल मालक संगीत मिस्किन यांना बोलावून घेतले. त्यांनी खात्री केली असता दत्ताराम घाणेकर मृत अवस्थेत आढळून आले.

या घटनेची माहिती मिळताच गुहागर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. दत्ताराम यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:27 AM 16/May/2025