गुहागर : तालुक्यातील आरे नागदेवाडी येथील ७७ वर्षीय वृद्ध, धाडू साठले, यांचा मृतदेह पवार साखरी मुळगाववाडी येथील नदीपात्रात खडकाळ जागी आढळून आला. ते १० मे २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून बेपत्ता होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धाडू साठले हे १० मे रोजी कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेले होते. त्यांच्या बेपत्ता असल्याची तक्रार ११ मे रोजी गुहागर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला होता. १५ मे रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह पवार साखरी मुळगाववाडी येथील नदीपात्रात खडकाळ जागी मिळून आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:05 PM 17/May/2025














