दापोली : उंबर्लेत दुचाकीच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

दापोली : दाभोळ मार्गावरील उंबर्ले येथील मराठी शाळेजवळ दुचाकीच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता. १६) सकाळी घडली. याबाबत दापोली पोलिस ठाण्यात दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दापोली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रवींद्र रामचंद्र रसाळ (रा. उंबर्ले) यांचे वडील रामचंद्र सखाराम रसाळ (वय ७५) हे काल सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आपल्या शेतावर काम करण्यासाठी जात होते.

ते दापोली-दाभोळ रोडवरील उंबर्ले शाळेसमोर पोहोचले असता दापोलीहून दाभोळकडे संशयित दुचाकीस्वार ऋतिक लक्ष्मण गुरव (वय २३, रा. आगरवांगणी) हा दुचाकीने जात होता.

त्याने रस्त्याचा अंदाज न घेता रामचंद्र रसाळ यांना धडक दिली. यामध्ये त्यांना डोक्याला व शरीरावर गंभीर दुखापत झाली. त्यांना तत्काळ दापोली येथील उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, मात्र डॉक्टरांनी तपासानंतर त्यांना मृत घोषित केले. दापोली पोलिसांनी संशयित ऋतिक लक्ष्मण गुरव याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस करीत आहेत.

Tata nexon

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:39 PM 17/May/2025