खेड : कोकण रेल्वे मार्गावरुन धावणाऱ्या ५ रेल्वे गाड्या गुरुवारी विलंबाने धावल्या. नागपूर-मडगाव स्पेशलसह सीएसएमटी-करमाळी उन्हाळी स्पेशल २ तास उशीराने मार्गस्थ झाल्या.
उधना-मंगळूर स्पेशल १ तास २० मिनिटे तर सावंतवाडी-दिवा एक्स्प्रेस १ तास विलंबाने धावली. एर्नाकुलम-एलटीटी दुरांतो एक्स्प्रेस १ तास १० मिनिटे विलंबाने धावली. हा अपवाद वगळता उर्वरित सर्व रेल्वे गाड्या नियोजन वेळेत मार्गस्थ झाल्या. त्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:45 PM 17/May/2025













