चिपळूण : पशुगणनेत कोंबड्यांची संख्या अव्वल

चिपळूण : तालुक्यातील २१वी पंचवार्षिक पशुगणना मार्चअखेर पूर्ण झाली असून, तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागांतील पशुगणनेंतर्गत ९३,३६० पशुधनाची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये कोंबड्यांची संख्या ६१ हजार तर गायवर्ग पशुधन १९ हजार असल्याची नोंद पशुगणनेत करण्यात आली आहे.

शासनाच्या आदेशानुसार २५ नोव्हेंबरपासून पशुगणनेला प्रारंभ झाला आहे. तालुक्यातील १६७ गावांमधील पशुगणना करण्यात आली. सद्यःस्थितीचा विचारा करता ग्रामीण भागात पूर्वी पेक्षा पशुधन कमी झाले आहे. शेती करण्याचे प्रमाण कमी झाल्याने शेतकऱ्यांकडे पशुधन उरलेले नसल्याचे पुढे आले आहे. त्यामध्ये चिपळूण तालुक्यात गायवर्ग यांची नोंद झाली आहे.

यात संकरित गायी, देशी, कोकण कपिला आणि बैल यांचाही समावेश आहे. तालुक्यात एकूण १९ हजार ३५ गायवर्ग पशुंची नोंद झाली आहे. म्हैस पशूमध्ये एकूण ७,४१४ पशुंची गणना झाली आहे. ग्रामीण आणि शहरी भागात एकूण ४,९७२ शेळ्यांची नोंद झाली आहे.

पशुगणनेत चिपळूण तालुक्यात कोंबड्यांची संख्या अधिक आहे. तालुक्यात एकूण ६१,२६९ एवढी कोंबड्यांची नोंद झाली आहे. यामध्ये गावठी २३,३३० तर मिश्रित जातीच्या ३७,९३९ कोंबड्या आहेत. तालुक्यात शहरी व ग्रामीण भागात ६७० कुत्र्यांची गणना झाली आहे. तालुक्यात एकूण १६७ गावे, तर शहरातील २० प्रभागामध्ये ही पशुगणनेची मोहीम राबवली गेली आहे. त्यासाठी ग्रामीण भागात ५ पर्यवेक्षक तसेच शहरासाठी १ पर्यवेक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे. यासाठी ३१ प्रगणकांनी काम पाहिले.

गायवर्ग जनावरे
संकरित गायी
: -२,७६३
देशी गायी : -२,४६६
कोकण कपिला : ४,४८३
गावठी : ९.३२३
देशी म्हैस : -३,४२४
गावठी : ३,९९०

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:21 PM 17/May/2025