चिपळूण : तालुक्यातील कळंबस्ते येथे एकाने नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दोघांची १३ लाख २४ हजार ८०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी १६ मे रोजी चिपळूण पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. शरद विजयकुमार पवार (रा. करंजे, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुभाष भगवान घाडगे (वय ५९, सेवानिवृत्त, रा. कळंबस्ते, ता. चिपळूण) यांनी तक्रार दाखल केली. त्यांची आणि साक्षीदार शेषराव येनाजी राठोड यांची संशयित शरद विजयकुमार पवार याने १५ मार्च २०२४ ते ११ जुलै २०२४ या कालावधीत आर्थिक फसवणूक केली. शरद पवार याने सुभाष घाडगे यांना ९ लाख ४ हजार ८०० रुपये आणि शेषराव राठोड यांना ४ लाख २० हजार रुपये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून पैसे उकळले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 AM 19/May/2025













