फळप्रक्रिया उद्योगांना शासकीय मदत मिळावी : संतोष गांगण

राजापूर : कोकणात पिकणाऱ्या विविध फळांपासून तयार होणाऱ्या उत्पादनांना जागतिकस्तरावर विविध देशांमधून मोठ्याप्रमाणात मागणी आहे. त्यामुळे कोकणात फळ प्रक्रिया उद्योगांना एकाच प्लॅटफॉर्मवर आणताना त्यांना शासकीय मदत मिळावी, अशी मागणी भाजपचे नेते संतोष गांगण यांनी केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्याकडे केली. त्याला केंद्रीयमंत्री श्री. पासवान यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती श्री. गांगण यांनी दिली.

केंद्रीयमंत्री श्री. पासवान यांची भाजपचे नेते श्री. गांगण यांनी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली. या भेटीच्यावेळी त्यांनी कोकणामध्ये तयार होणारी विविधांगी फळे त्यावर आधारित फळप्रक्रिया उद्योग आणि जागतिक बाजारपेठ यावषयी सविस्तरपणे चर्चा केली.

कोकण मेव्यावर प्रक्रिया करून त्यांच्यापासून मँगो पल्प, काजूगर, कोकम सरबत, आंबा वडी, फणस पोळी, खोबरा वडी, करवंद सिरप आदी उत्पादने तयार केली जातात.

भारत सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने जानेवारीमध्ये नोएडा येथे भरविलेल्या इंडस फूड प्रदर्शनामध्ये रायपाटण येथील कोकण बाग अॅग्रोटुरिझम फार्मर प्रोड्युसर कंपनी सहभागी झाली होती. त्यावेळी आपणही त्या ठिकाणी उपस्थित होतो.

Tata motars punch

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:54 AM 19/May/2025