नाटे ठाकरेवाडी येथील खून प्रकरणातील ‘त्या’ दोन्ही संशयीतांना २० मे पर्यंत पोलीस कोठडी

राजापूर : तालुक्यातील नाटे ठाकरेवाडी येथील खून प्रकरणातील त्या दोन्ही संशयीत आरोपींना २० मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या दोन्ही संशयीत आरोपींना पोलीसांनी शुक्रवारी अटक केली होती.

त्यांना शनिवारी राजापुर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने २० पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तशी माहिती तपास अधिकारी नाटे सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांनी दिली आहे.

दारूच्या नशेत असताना किरकोळ कारणातून झालेल्या वादातून आपल्या सख्ख्या लहान भावाला चंद्रकांत लहू ठाकरे व पुतण्या अमोल चंद्रकांत ठाकरे यांनी मारहाण केली. या मारहाणीत स्वप्नील लहू ठाकरे (45, रा.नाटे ठाकरेवाडी) याचा मृत्यु झाला आहे. या प्रकरणी खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या प्रकरणी नाटे पोलीसांनी संशयीत आरोपी चंद्रकांत ठाकरे व त्याचा मुलगा अमोल ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून शुक्रवारीच अटक केली होती. त्यांना शनिवारी राजापूर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने या दोघांनाही २० मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी नाटे सागरी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर अधिक तपास करत आहेत.

Ratnagiri Khabardar add image

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 19-05-2025