खेडमध्ये गांजा ओढणाऱ्या तरुणावर कारवाई

खेड : पुलाखाली गांजा ओढणाऱ्या तरुण कामगाराला खेड पोलिसांनी रंगेहाथ पकडून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी सुकिवली पुलाखाली करण्यात आली. शंकर विनोद पारदे (२९, रा. सुकिवली-बौद्धवाडी, खेड) असे तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी शिपाई राहुल कोरे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या दरम्यान ते गस्त घालत असताना त्यांना सुकिवली पुलाखाली शंकर पारदे हा गांजा ओढताना सापडला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:26 PM 19/May/2025