मियावाकी जंगलात निसर्ग वाचनाचा आनंद : चिपळूण पालिकेचा उपक्रम

चिपळूण : गेले सहा आठवडे नगरपालिकेसह लोकमान्य टिळक स्मारक वाचनालय आणि भोगाळेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय यांच्या वतीने वाचू आनंदाने हा उपक्रम दर रविवारी आयोजित करण्यात येत आहे. निसर्गाच्या सान्निध्यात सकाळी आठ ते दहा या वेळेत विद्यार्थी, नागरिक आपल्याला हवे ते पुस्तक वाचण्याचा आनंद घेतात.

यावेळी पुस्तक वाचनाबरोबरच निसर्ग वाचनाचाही अनुभव साऱ्यांनी घेतला. रामशेठ रेडीज यांच्या एसआर फार्म येथील मियावाकी जंगलात पुस्तक वाचन व निसर्ग वाचनाचा आनंद घेतला.

रामशेठ रेडीज यांनी रेडीज पेट्रोल पंप येथून धामणवणेत जाण्यासाठी खास बसची व्यवस्था केली होती. या बसमधून ग्रंथालयाचे कर्मचारी, नगर पालिकेचे कर्मचारी व वाचक या ठिकाणी पोहोचले. मियावाकी जंगलात बसून सर्वांनी एक तास वाचन केले. त्यानंतर निसर्ग वाचनाचा उपक्रम झाला. रामशेठ रेडीज, विश्वास पाटील, अजित जोशी यांनी इथल्या जंगलाविषयीची माहिती दिली.

या वेळी मुख्याधिकारी विशाल भोसले, लेखक साहित्यिक प्रकाश देशपांडे, मंगेश पेढांबकर, सावित्रीताई होमकळस, बापू काणे, अशोक भुस्कुटे, अश्विनी भुस्कुटे, सुनिल खेडेकर, प्राची जोशी, राष्ट्रपाल सावंत, शहानवाज शहा, रमा करमरकर, विलास महाडिक, कैसर देसाई आदी उपस्थित होते.

cake of the day

पुस्तक वा निसर्ग वाचनानंतर चिपळूण स्लोबल टुरिझमच्यावतीने महेंद्र कासेकर, शहानवाज शहा, प्रा. विनायक होमकळस, विश्वास पाटील आदींनी मान्यवरांचे स्वागत केले व सत्कार केला. प्रकाश देशपांडे, विशाल भोसले, बापू काणे यांनी पुस्तकांबरोबर निसर्ग वाचन किती आवश्यक आहे, हे सांगितले, लहान मुलांसह वयोवृद्धही या निसर्ग वाचनाच्या उपक्रमात सहभागी झाले होते. पुढच्या रविवारी श्री देवी करंजेश्वरी मंदिर गोवळकोट येथे वाचू आनंदाने हा उपक्रम होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:53 PM 19/May/2025