रत्नागिरी : जिल्ह्यात सरासरी १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत सरासरी १०३.९९ मिलिमीटर पाऊस पडला. या पावसाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी हानी झाली.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सर्वाधिक १९०.४० मिमी पाऊस गुहागर तालुक्यात नोंदविला गेला.

अन्य तालुक्यातील पावसाची आकडेवारी अशी – १) मंडणगड-27.75 मिमी,२) खेड-94.28 मिमी, ३) दापोली- 105.71 मिमी, ४) चिपळूण – 99.22 मिमी, ५) संगमेश्वर 116.45 मिमी, ६) रत्नागिरी -124.11 मिमी, ७) लांजा – 128.00 मिमी, ८) राजापूर 50.00 मि मि

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी नैसर्गिक आपत्ती ओढवली. रत्नागिरी पावस मार्गावर भाट्ये येथे सुरू बनातील एक झाड कोसळल्याने वाहतूक संथ गतीने सुरू होती. भाट्ये गावचे माजी सरपंच पराग भाटकर व त्यांचे सहकारी, भाट्ये ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन रस्त्यावर पडलेले झाड तोडून बाजूला केले. कोळंबे येथे विनायक गुळेकर यांच्या घरावर वीज पडून विजेच्या वस्तूंचे हजारो रुपयांचे नुकसान झाले. शिरगाव येथे शिवराज शेट्ये यांच्या घराच्या पडवीवर झाड पडून दहा हजाराचे नुकसान झाले. कोळीसरे येथे जगन्नाथ शिंदे यांच्याही घरावर झाड पडून नुकसान झाले. मिरजोळे येथे दयानंद जाधव यांच्या गोठ्याचे तर प्रकाश जाधव यांच्या घरावर झाड पडून नुकसान झाले. मंडणगडमध्ये शबाना पोशीलकर यांच्या घरावर वीज कोसळून, घराला आग लागल्याने नुकसान झाले.

Radhakrushna patapedhi

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:16 24-05-2025