महाराष्ट्र प्रीमियर लीग : ‘सीझन ३ मध्ये’ खेळणार रत्नागिरी जेट्स

रत्नागिरी : महाराष्ट्र प्रीमियर लीगचे दोनवेळचे विजेते रत्नागिरी जेट्स आगामी सीझन ३ मध्येही दणक्यात खेळणार आहेत. पुरुषांची एमपीएल स्पर्धा ४ ते २१ जूनदरम्यान होणार आहे.

महिला महाराष्ट्र प्रीमियर लीगचा पहिला सीझन ५ ते १४ जूनदरम्यान पार पडणार आहे. रत्नागिरी जेट्स संघाला गद्रे मरिन हे अधिकृत प्रायोजक म्हणून तर स्निक्स स्पोर्ट्स हे अधिकृत मर्चेंडाईज पार्टनर म्हणून सहभागी झाले आहेत.

फ्लिटगार्ड फिलट्रम, चितळे बिंजबार आणि पिटारा यांच्यासमवेत आता गद्रे मरिन आणि स्निक्स स्पोर्टस् रत्नागिरी जेट्ससोबत आहेत. रत्नागिरी आणि महाराष्ट्रातील तळागाळातील क्रिकेटचा स्तर उंचावणे, उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रशिक्षण व साहित्य, उपकरणे यामध्ये गुंतवणूक करून पुरुष आणि महिला दोन्ही गटांतील क्रिकेट प्रतिभेला घडवणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे.

यासंबंधी जेट सिंथेसिसचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजन नवनी म्हणाले की, रत्नागिरी जेट्सने पुरुषांच्या एमपीएलमध्ये दोन सलग विजेतेपदांनी गुणवत्ता सिद्ध केली आहे. आता अशीच ऊर्जा महिलांच्या संघातही आली पाहिजे, याकरिता प्रयत्न सुरु आहेत.

Khabardar diwali fest

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 AM 29/May/2025