कांद्याचे दर घसरले..

रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरातच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे बाजारामध्ये नेण्यासाठी काढून ठेवलेला कांदा पूर्णपणे भिजला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी कांद्याचा दर घसरला आहे.

रत्नागिरी बाजारपेठेतही कांद्याच्या दरात घट झाली आहे. अर्थात दर कमी झाला असला तरी भिजलेला कांदा घेण्यास ग्राहक पुढे येत नसल्याचेही चित्र दिसत आहे. या पावसाने राज्यात अनेक भागांमध्ये विविध प्रकारचे नुकसानही केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:31 PM 30/May/2025

Arihant 3