साखरपा : ग्रुप ग्रामपंचायत किरबेट-भोवडे पोटनिवडणूक ४ ऑक्टोबरला पार पडली. यामध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कांबळे यांच्या पत्नी ‘उबाठा’ गटाच्या सौ. प्रिया प्रकाश कांबळे यांची बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीसाठी नायब तहसीलदार गोताड यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.
यावेळी माजी पंचायत जया माने यांनी सौ. कांबळे यांचे अभिनंदन केले. त्यांच्यासमवेत केतन दुधाणे, दत्ता वाघधरे, उदय पत्की, सचिन अंकुशराव, देवडे सरपंच विलास कांगणे तुळशीदास कांबळे, प्रशांत अडबल, उपसरपंच सतीश कांबळे, अस्मिता अडबल, रेवती निंबाळकर, माधर्व जायगडे, ग्रामसेवक शेळके आदी मान्यवर उपस्थित होते. ६० वर्षांच्या इतिहासात बौद्ध समाजाला प्रथमच सरपंचपत मिळाले असल्याची यावेळी माहिती देण्यात आली. यावेळ प्रिया प्रकाश कांबळे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. आपल्याला मिळालेल्या पदाचा वापर करून आपण गावच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:04 PM 12/Oct/2024