काँग्रेसच्या दापोली विधानसभा क्षेत्राध्यक्षपदी समद मांडलेकर यांची नियुक्ती

मंडणगड : काँग्रेस (आय) पक्षाचे म्हाप्रळ येथील कार्यकर्ते समद अलिमियाँ मांडेलकर यांची पार्टीच्या दापोली विधानसभा क्षेत्राध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. पार्टीचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी १२ ऑक्टोबर २०२४ रोजी श्री. मांडलेकर यांना या संदर्भात नियुक्तीचे पत्र दिले असून, आपण भूतकाळात पक्षासाठी निष्ठेने केलेल्या कामाची दखल पक्षाने घेतली असल्याचे स्पष्ट करताना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. श्री. मांडेलकर यांनी यापूर्वी तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष, बेसिक कार्यकारिणी उपाध्यक्ष अशा विविध पदांवर समर्थपणे काम करत तालुक्यात पक्ष वाढविला आहे. मतदारसंघातील तीनही तालुक्यात त्यांचा उत्तम संपर्क आहे. निवडीबद्दल तालुका अध्यक्ष मुश्ताक मिरकर व तालुक्यातील सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 AM 14/Oct/2024