राजापूरच्या निल कुडाळी याचे आंतरराष्ट्रीय रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत यश

राजापूर : राजापूर तालुक्यातील ११ वर्षीय निल कुडाळी याने आंतरराष्ट्रीय रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत १४०८ गुण मिळवून आपले कौशल्य सिद्ध केले आहे. त्याच्या या यशामुळे राजापूरचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले असून, प्रांताधिकारी डॉ. जास्मिन शेख यांनी निलचे विशेष अभिनंदन केले.

यावेळी गट शिक्षण अधिकारी उत्तम शिवाजी भोसले उपस्थित होते. निल हा राजापूर रॉयल चेस अकादमीमध्ये मोहसीन सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली बुद्धिबळाचे धडे गिरवत आहे. विशेष म्हणजे निल हा जिल्हा परिषद विश्वनाथ विद्यालयाचा विद्यार्थी असून तो सध्या पाचवी इयत्तेत शिकत आहे. डॉ. जास्मिन शेख यांनी निलसारख्या युवा खेळाडूंना प्रोत्साहन मिळाल्यास ते भविष्यात मोठी कामगिरी करू शकतात, असे सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:33 PM 21/Jun/2025

Shanti2