रत्नागिरी : जवाहर नवोदय विद्यालयात निवड चाचणीसाठी अर्जाची २९ जुलै अंतिम तारीख

रत्नागिरी : पडवे येथील जवाहर नवोदय विद्यालयात सत्र २०२६- २७साठी इयत्ता ६वीसाठी निवड चाचणीसाठी https://navodaya.gov.in या लिंकवर ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख २९ जुलै आहे, तरी जिल्ह्यातील इयत्ता ५ वीत शिकणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यालयाच्या प्राचार्यांनी केले आहे.

ही प्रवेश परीक्षा जिल्ह्यातील विविध केंद्रावर १३ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे. अधिक माहितीसाठी निवड चाचणी परीक्षा प्रमुख नागेश शेकडे, मोबाईल क्रमांक ९०२१३३४४३३ या क्रमांकावर संपर्क साधावा.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 AM 09/Jul/2025