दापोली : झाड कोसळून शाळेचे नुकसान

गावतळे : दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा शिरवणे नं. २ शाळेवर जुने आंब्याचे झाड कोसळल्याने बांधकामांला तडा गेला आहे. तसेच संरक्षक भिंतीसह पाण्याच्या तीन टाक्यांचे नुकसान झाले. हे झाड रात्रीच्या वेळी पडल्याने मनुष्यहानी टळली.

जिल्हा परिषद मराठी शाळा शिरवणे ही २००७ रोजी उभारण्यात आली होती. आंब्याचे झाड संरक्षक भिंतीच्या बाहेर होते. ३ रोजी रात्री झाड पडल्याची माहिती मिळाल्यानंतर मुख्याध्यापक रेवाळे यांनी तत्काळ वरिष्ठांना माहिती दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी फांद्या तोडून परिसर साफ केला. या प्रकरणाचा पंचनामाही झाला आहे; परंतु पाच दिवस होऊनही शाळेवरून झाड बाजूला करण्यात आलेले नाही. त्यामुळे ग्रामस्थ प्रशासनावर नाराज आहेत. यामध्ये शाळेच्या इमारतीचे आठ लाखांचे नुकसान झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:29 09-07-2025

Happy journey marathi