संगमेश्वर : आरवली बीएसएनएल टॉवर नादुरुस्त

संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथील भारत संचार निगमचा मोबाईल टॉवर गेले १५ दिवस नादुरुस्त आहे. त्यामुळे आरवली, यांच्यासह आजुबाजूच्या अनेक गावातील बीएसएनएल ग्राहकांची मोबाईल सेवा पूर्ण बंद झाली आहे. मोबाईल याचा फटका केवळ सामान्य नागरिकांनाच नव्हे तर व्यापारी, शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांनाही बसत आहे. विशेषतः डिजिटल व्यवहार, मोबाईल बँकिंग, आरोग्यविषयक सेवा, ऑनलाईन शिक्षण यावर मोठा परिणाम झाला आहे.

स्थानिक ग्रामस्थांनी बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्या असूनही दुरुस्तीच्या कामाला कोणतीही गती मिळत नसल्याचा आरोप केला जात आहे. यामुळे नाराज ग्राहकांनी आता तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:05 AM 11/Jul/2025