महाराष्ट्रात ‘सशुल्क मासिक पाळी रजा’ योजना सुरू करण्याची मागणी

पुणे : राज्य सरकारने अलीकडेच महिलांच्या कल्याणासाठी ‘लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे. त्यातून महिलांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. त्याप्रमाणेच महाराष्ट्रात ‘सशुल्क मासिक पाळी रजा’ योजना सुरू करावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस डॉ. रघुनाथ कुचिक यांनी केली आहे.

कुचिक यांनी कामगारमंत्र्यांकडे पत्राद्वारे ही मागणी केली. मासिक पाळी हा महिलांचा नैसर्गिक जैविक प्रक्रियेचा भाग असून, त्याचा त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे ‘सशुल्क मासिक पाळी रजा’ देणे, हे केवळ नैसर्गिक प्रक्रियेची दखल घेणेच नाही, तर महिला सक्षमीकरण आणि कार्यक्षमता वाढवणारे असेल, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. कर्नाटक सरकारने अलीकडेच असे धोरण लागू केले असून, महाराष्ट्रानेदेखील महिलांच्या आरोग्य आणि कल्याणाकडे लक्ष देणारे हे धोरण स्वीकारावे, असे त्यांचे म्हणणे आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:02 16-10-2024

Ratnagiri Khabardar add image