कोकणात गतवर्षीपेक्षा २५ टक्के पर्जन्यमान कमी

रत्नागिरी : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात १ जून ते १० जूनपर्यंत १९ हजार ५२३.५५ मि.मी. म्हणजेच ६४.४८ टक्के इतका पाऊस झालेला आहे. तर गतवर्षी याच महिन्यापर्यंत २९ हजार मि.मी. (९५.९८ टक्के) इतका पाऊस झाला होता. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा २५ टक्के पर्जन्यमान कमी झाला आहे.

जिल्ह्यात आता पावसाचा जोर ओसरला असून, काही तालुक्यात मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम पावसाची बरसात होते. पर्जन्यमान कमी झाले असले, तरी भात, नाचणीची लावणी पूर्ण झालेली आहे. कोकणात मान्सूनपूर्व पावसाने मे महिन्यातील अखेरच्या आठवड्यात हजेरी लावली. ८ दिवसांत जिल्ह्यात धो-धो पाऊस झाला. त्यानंतर जून महिन्यात मान्सूनच्या पावसाने एन्ट्री केली. जून महिन्यात सर्वाधिक पाऊस झाला तर जुलै महिन्यात काहीसा कमी झाला. दोन महिन्यांत पावसाने तुफान बॅटिंग केली. पावसामुळे ३ कोटींहून अधिक सार्वजनिक मालमत्ता, शेतीचे नुकसान, वीज पडून व्यक्तीचा मृत्यू, जनावरांचा मृत्यू झालेला आहे. शासनाच्या वतीने भरपाई देण्यास सुरूवात झाली आहे. दोन महिन्यांत भात, नाचणीचे पुनर्लागवड पूर्ण केली असून, ९५ टक्क्यांहून अधिक लागवड झाली आहे. जिल्ह्यातील, नद्या, धरणे फुल्ल झाली आहेत. एकंदरीत जून, जुलै महिन्यांत पावसाने दमदार बॅटिंग केली. तर ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी दिली असून एकंदरीत कोकणात गतवर्षीच्या २१६९.२८ तुलनेत यंदाच्या वर्षी २५ टक्के पर्जन्यमान कमी झाल्याचे दिसून येते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:27 PM 11/Aug/2025

Radhakrushna patapedhi