चिपळूणचे डीवायएसपी राजेंद्रकुमार राजमाने यांची बदली

चिपळूण : येथील उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांची बदली झाली आहे. रत्नागिरी येथील जात पडताळणी विभागात त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर चिपळूण उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून मुंबई येथून प्रकाश बेले यांची नेमणूक करण्यात आली आहे. लवकरच ते चिपळूणमध्ये रुजू होणार आहेत.

राजेंद्रकुमार राजमाने यांनी दोन वर्षे चिपळूणमध्ये डीवायएसपी म्हणून जबाबदारी सांभाळली. या कालावधीत शहरातील चोऱ्या, सावर्डे विभागात झालेला खून, गुहागरमधील खुनाचा उलगडा केला. या शिवाय चिपळूण शहरात ८६ सीसीटीव्ही बसविण्यामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती. यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:18 PM 11/Aug/2025

Kohinoor furni.