रत्नागिरी : शिक्षणाधिकारी संपामुळे शैक्षणिक कामकाज ठप्प

रत्नागिरी : नागपूर विभागातील बोगस शालार्थ आयडी प्रकरणावरून शिक्षण विभागातील अधिकारी आक्रमक झाले आहेत. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेले बेमुदत काम आंदोलन पाचव्या ? दिवशी मंगळवारीही सुरूच होते. जिल्ह्यात शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, अधीक्षक, विस्तार अधिकाऱ्यांनी काम बंद केल्याने कामकाजावर परिणाम झाला.

सोमवारी जिल्ह्यातील सर्व विस्तार अधिकाऱ्यांनी सामूहिक रजा घेत जिल्हा परिषद प्रशासनाला निवेदन दिले. त्याचबरोबर सोमवारपासून शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी हे श्रेणी-1 चे?? अधिकारी बेमुदत संपात गेले आहेत. नागपूर विभागातील बोगस शालार्थ आयडी प्रकरणात चोर सोडून संन्याशाला फाशी, या म्हणीप्रमाणे तपास यंत्रणा काम करत आहेत. शासनाची परवानगी न घेता शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे विनाचौकशी अटकसत्र सुरू केले आहे. त्यामुळे चौकशीविना अधिकाऱ्यांना अटक करू नये, अशी मागणी करत शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी बेमुदत सामूहिक रजा आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघाने सामूहिक रजा आंदोलन सुरू केले. या आंदोलनामध्ये जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक राजपत्रित अधिकारी, सहभागी झाले आहेत. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनीच आंदोलन सुरू केल्याने कार्यालयीन कामकाज ठप्प झाले आहे. शिक्षण मंत्री यांच्या सोबतच्या बैठकीत मार्ग निघाला नाही, तर आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे.

सोमवारी जिल्ह्यातील विस्तार अधिकाऱ्यांनी सोमवारी सामूहिक रजा घेत आंदोलन केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांना निवेदन देण्यात आले. मंगळवारी हे विस्तार अधिकारी कामावर रूजू झाले होते. असे असले तरी श्रेणी -1 चे सर्व अधिकारी बेमुदत संपावर गेले होते. यामुळे जिल्हा परिषदेमधील शिक्षण विभागाचा कारभार ठप्प झाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:15 AM 13/Aug/2025