दापोली : असोडच्या शहीद हुतात्मा कुटुंबियांचे आज उपोषण

दापोली : असोंड गावातील स्वकष्टाच्या मिळकतीतील गट नं ५४६ या मिळकतीत माझे नाव लावण्यास तहसीलदार यांनी आदेश देऊनही तलाठी टाळाटाळ करत आहे, असा आरोप असोंड येथील राजाराम रसाळ यांचा आहे. आम्ही शहीद हुतात्मा काशिनाथ वासुदेव रसाळ यांच्या कुटुंबातील असून शहिदांच्या कुटुंबियांना शासन न्याय देण्यास टाळाटाळ करत आहे हे आमचे दुर्दैव आहे, असे रसाळ यांनी माहिती देताना सांगितले.

२१ एप्रिल रोजी आपण आदेश उलटून गेले आहेत. आदेशाची नोंद तलाठी असोंड हे फेरफार सदरी दाखल करत नसल्यामुळे मला व माझ्या कुटुंबाला मानसिक व शारीरीक त्रास सहन करावा लागत आहे. तरी या आदेशाची नोंद घालण्यासाठी वारंवार तलाठी कार्यालयात खेटे घालावे लागत आहेत तरीही नोंद घातली जात नाही. त्यामुळे मी व माझे कुटुंब येत्या १५ ऑगस्ट रोजी आपल्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसणार आहोत, असे राजाराम रसाळ यांनी दापोली तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:14 PM 15/Aug/2025