बाबू पाटील मित्रमंडळाची खंडाळा येथे लाखाची दहीहंडी

रत्नागिरी : शनिवारी रत्नागिरी जिल्ह्यात दहीहंडी उत्सव साजरा होत असून, रत्नागिरी तालुक्यातील खंडाळा या पंचक्रोशीच्या ठिकाणी बाबू पाटील मित्रमंडळाच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे लाखाची दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे.

यावेळी ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले असून राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे या मंडळाला भेट देऊन गोविंदा पथकांचे मनोबल वाढवणार आहेत.

माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद उर्फ बाबू पाटील यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष वाटद येथे लाखाची दहीहंडी आयोजित करण्यात येते. पाच थर उभारणार्‍या गोविंदा पथकाने पारितोषिक देऊन गौरवण्यात येते. पाच थराच्यावरती थर लावणार्‍यांचा विशेष गौरवही करण्यात येतो. या दहीहंडीनिमित्त कोल्हापूर येथील प्रसिध्द झंकार ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी श्रीकृष्ण जयंती असल्याने शनिवारी गोपाळकाळानिमित्त मंडळाचे पदाधिकारी हा उत्सव यशस्वी करण्यासाठी जोरदार तयारी करीत आहेत.

राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत हे शनिवारी सायंकाळी 5.30 वा. खंडाळा येथे उपस्थित राहून गोविंदा पथकांचे मनोबल उंचावणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:31 15-08-2025