वेण्णा, गिरीधर यांच्या अंगी कठोर वैराग्य होते : प्रा. अंजली बर्वे

चिपळूण : दासानुदासी वेण्णा आणि गिरीधर प्यासी मेरा या दोघींच्या अंगी कठोर वैराग्य होते. दोघीही तपस्विनी असल्याने चिंतन अभ्यास करून भान जपले होते. रूढी परंपरांच्या पलीकडे जाण्याची ताकद त्यांनी मिळवली होती. गुरुभक्ती आणि देवभक्ती हे त्यांच्या जीवनाचे केंद्र होते, अशा शब्दांत प्रा. अंजली बर्वे यांनी समर्थ रामदासांच्या शिष्या वेण्णा आणि साध्वी मीराबाई यांच्या भक्तीचा संदर्भउपस्थित केला.

लक्ष्मीनारायण मंदिरातील श्रीकृष्ण व्याख्यानमालेच्या ९७ व्या वर्षातील सोमवारी आयोजित प्रा. बर्वे यांनी समर्थ शिष्या वेण्णा आणि मीरा या विषयावर व्याख्यान दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि प्रा. बर्वे यांचा परिचय मधुरा बापट यांनी करून दिला तर माजी विश्वस्त सुजाता देवधर यांनी आभार मानले. या वेळी प्रा. बर्वे म्हणाले, ‘समर्थांच्या शिष्या वेण्णा या सधन घरातील असून, नकळत्या वयातच वैधव्य आले होते. समर्थांनी त्यांना मठाच्या कामात सहभागी करून घेतले. गायनकला, वाचन आणि कीर्तन शिकवले. वेण्णाबाईंनी ‘सीता स्वयंवर’ हे सुंदर, सुबोध आणि प्रासादिक काव्य रचले, ज्यासाठी त्यांनी वाल्मीकी रामायणाचा सखोल अभ्यास केला. भक्ती म्हणजे केवळ भावनांची लाट नसून त्यामागील वैराग्य, दृढ निश्चय आणि अखंड साधना यांचा संगम आहे, असे त्यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:15 PM 15/Aug/2025

JMBR ACADEMY – ADMISSIONS OPEN!