देवरुखात महाराजस्व अभियांनातर्गत जिवंत सातबाराचे वितरण

देवरुख : महसूल सप्ताहांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान तहसीलदार कार्यालय देवरुख येथे पार पडले. या कार्यक्रमांतर्गत उत्पन्नाचे दाखले, जिवंत ७-१२ मोहिमेअंतर्गत वारस तपास केलेले ७-१२ लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले.

तसेच पोलिस, आरोग्य विभाग, दय्यम निबंधक कार्यालय या विभागांच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयातील विविध योजनांची माहिती दिली. या कार्यक्रमासाठी तहसीलदार अमृता साबळे, निवासी नायब तहसीलदार भाऊ गिरी, निवडणूक नायब तहसीलदार मिलिंद सावंतदेसाई, दुय्यम निबंधक लोखंडे, पोलिस निरीक्षक उदय झावरे, आरोग्य अधिकारी अहिरे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार कदम, मंडळ अधिकारी रोहित पाठक, ग्राम महसूल अधिकारी सुधीर सोनवणे उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:55 AM 16/Aug/2025